डॉक्टराला मागितली खंडणी,तीन आरोपी अटक


डॉक्टराला मागितली खंडणी,तीन आरोपी अटक


डॉक्टराचे अश्लील विडिओ वायरल करण्याची धमकी देत करत होते ब्लॅकमेल


 माजरीच्या वेकोलि रुग्णालयात रुजू असलेले डॉ कैलास उंबरकर त्यांचे व्यक्तिगत महिला मित्रा सोबतचे अश्लील विडिओ असलेले सैमसंग कंपनीचे १६ जीबी ची मेमोरी कार्ड २०१७ मध्ये गहाड झाले होते .दरम्यान दिलीप कुमार राम यानी २ फेब्रूवारी २०२० रोजी डॉ उम्बरकर यांना ८६५७९८९९३२ या मोबाइल क्रमांकाने फोन करून तुमचे अश्लील वीडियोचे मेमोरी कार्ड माझ्याकड़े आहे तुम्ही नेहरू क्लब जवळ येवून माझ्याशी संपर्क करा असे सांगितले . दरम्यान फिर्यादीं हा ठरविलेल्या प्रमाणे दुपारी १ वाजता नेहरू क्लब येथे गेला असता दिलीप राम हा त्यांचेकडून एक लाख रुपयाची मागणी केली व न दिल्यास तुमचे अश्लील वीडियो मेमोरी वायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर १६ फेब्रूवारी २०२० रोजी फिर्यादी पत्नीच्या मामाला सोडायला माजरी रेलवे स्टेशनला गेलो असता दिलीप राम वय २७ वर्षे रा माजरी, सद्दाम सिद्दीकी वय २७ वर्षे रा वार्ड नंबर एक माजरी, व अर्जुन उर्फ सिनू शंकर डोंगरवार वय २७ वर्षे यानी स्टेशनवर फिर्यादीला अडवून परत पैश्याची मागणी केली व जवळचे साढ़े तीन हजार रुपये हिसकवून घेतले. दरम्यान ३ में २०२०, ५ में २०२० ,८ में २०२०,११ में २०२० , ३ में २०२० ,२३ में २०२० या तारखेला ९२८४६३१६९१ या मोबाईल क्रमांकाने वरोरा येथून वारंवार फोन करून फिर्यादीला खंडणी करिता पैश्याची मागणी करीत होते व याच क्रमांकावरुन फिर्यादीचे व्हाट्सअपवर केक कापत असताना ,चुंबन घेताना आणि शारीरिक संबंध स्थापित करताना असे वेगवेगळे विडिओ पाठविले व लवकर पैशे पुरवा अन्यथा तुमचे सर्व वीडियो वायरल करून सर्व वृत्तपत्रात बातमी प्रकाशित करू अशी धमकी दिली. दरम्यान फिर्यादि ने बुधवारी रात्रो १०.३० वाजता पोलिस स्टेशन गाठुन तक्रार नोंदविली.फिर्यादीच्या तक्रारीवरुन माजरी पोलिसांनी 


दिलीप राम वय २७ वर्षे रा माजरी, सद्दाम सिद्दीकी वय २७ वर्षे रा वार्ड नंबर एक माजरी, व अर्जुन उर्फ सिनू शंकर डोंगरवार वय २७ वर्ष रा. आम्बेडकर वार्ड माजरी यांच्यावर खंडणी मांगने, धमकी देने व संगनमत करने अश्या विविध कलम ३८४,३८५,५०६,३४ अन्तर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणात पुन्हा चार ते पाच आरोपी अटक होण्याची शक्यता आहे यामध्ये अनेक नामवन्त सहभागी असल्याची माहिती आहे.


एक दिवसाची पोलिस कोठड़ी


गुरुवारी आरोपीना भद्रावतीच्या न्यायालयात हाजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठड़ी दिली.


पुढील तपास माजरीचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अजितसिंग देवरे, गजानन जुमड़े हे करीत आहे


रंगीन मिजाज डॉक्टर


डॉ.कैलाश उम्बरकर हे रंगीन मिजाजा चे असल्याची चर्चा आहे. डॉक्टर च्या घरी पती पत्नी च्या आपसात वारंवार भांडण व्हायचे हे भांडण पोलिस ठाण्यात सुद्धा पोहोचले आहे या मुळे अनेक चर्चेला उधाण येत आहे।


महाराष्ट्र सवांददाता किशोरी कांत चौधरी