माजरी मध्ये  रेशनकार्ड नसलेल्या गरजूना मदत कधी मिळणा...


 


माजरी मध्ये  रेशनकार्ड नसलेल्या गरजूना मदत कधी मिळणा...


सामाजिकांचे प्रशासनाला विचारणा


चंद्रपुर महाराष्ट्र :-किशोरीकान्त चौधरी
माजरी परिसरातील कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर माजरी च्या  समाजसेवक तथा लोकप्रतिनिधी च्या वतीने ठीक ठिकाणी गरजू लोकांना अन्न धान्य किट वाटप केले गेले त्यामुळे गरीब गरजू परिवारातील काही प्रमाणात उदरनिर्वाहसाठी मदद झाली परंतु काही ठिकाणी गरजू असलेल्या परिवाराला दोन तीन वेळा  किट वाटप झालेचे निदर्शनास आले परंतु माजरी येथील काही परिवार असे आहे ज्याच्या कडे रेशनकार्ड नाही असे  500 हुन अधिक कुटुंबाची यादी तयार करून माजरी येथील ग्रामपंचायत सदस्य रवि भोगे गोल्ला कोमरय्या, भारतीय मजदूर संघाचे सतीश कुडूदुला, प्रवीण आमटे अमित केवट सामाजिक कार्यकर्ते राजेश रेवते यांनी भद्रावती तहसील कार्यालयात व माजरी चे पटवारी यांना यादी सोपवली तहसीलदार ने संपूर्ण तालुक्यातील यादी बनवण्यासाठी पटवारी ला आदेश दिले.पटवारी व कोतवाल यांनी  जे गरजू लोक आहे त्याचे आधार नंबर मोबाईल नंबर घेऊन त्यांना अन्न वाटप करण्यात येईल असं सांगण्यात आलं. आज लोकडाऊन ला अढीच महिन्याचा कालावधी होऊन सरकारी धान्य दुकानातून धान्याचा एक ही कण रेशनकार्ड नसणाऱ्याना परिवाराला मिळाला नाही या बाबत कुणाला विचारपूस करावी कोणाला साकळे घालावे अशी स्थिती राशनकार्ड नसलेल्या परिवाराची झाल्याचे दिसून येत आहे काही परिवारातील सदस्यांची लॉकडावून च्या काळात काम धंदा बंद असल्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे.
आता माजरीतील सामाजिक आपुलकी असणाऱ्याने राशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजुना प्रशासन कधी रेशन देणार हे  महत्वाचे ठरले आहे प्रशासनच जबाबदार आहे.


 


महाराष्ट्र स्वाददाता किशोरी कांत चौधरी की रिपोर्ट